Pakistan PM
Pakistan PMTeam Lokshahi

Pakistan New PM : इम्रान खानचे सरकार कोसळले,'हे' होणार पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान

पुढील पंतप्रधानाची निवडणूक सोमवारी होणार
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. नॅशनल असेंब्लीतील अविश्वास प्रस्तावावरील मतदान पुढे ढकलण्याचा प्रत्येक प्रयत्न शनिवारी मध्यरात्रीनंतर अयशस्वी झाला. मध्यरात्री झालेल्या मतदानात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाच्या बाजूने १७४ सदस्यांनी मतदान केले असून हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत असल्याचे पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक ( Ayaz Sadiq) यांनी जाहीर केले.

Pakistan PM
इम्रान खान यांचा मास्टर स्ट्रोक; अविश्वास प्रस्ताव रद्द

दरम्यान, आता पुढील पंतप्रधानाची निवडणूक सोमवारी होणार आहे. इम्रान खान यांच्या विरोधात एकजूट राहिलेल्या विरोधकांनी शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांना पंतप्रधानपदाचा आधीच नवा चेहरा बनवलं आहे. अशा स्थितीत शाहबाजच पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं आहे.

शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत आणि ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे अध्यक्ष आहेत. अविश्वास ठराव जिंकल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी संसदेत सांगितले की, 'आज पुन्हा पाकिस्तानमध्ये संविधान आणि कायदा आला आहे. आम्ही कोणावरही सूड घेणार नाही, अन्याय करणार नाही. आम्ही निरपराधांना तुरुंगात पाठवणार नाही. कायदा मार्गी लागेल. आम्ही बिलावल भुट्टो आणि मौलाना फजलूर (युती पक्षांचे नेते) यांच्यासोबत सरकार चालवू.' असे शरीफ यांनी सांगितले.

इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांना 342 सदस्य असलेल्या सभागृहात 172 सदस्यांच्या पाठिंबा आवश्यक होता. अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 मते पडली आहेत. मतदानानंतर सभागृहातील विरोधी पक्षांनी गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com