पाकिस्तानमध्ये पुराचा कहर, 500 हून अधिक लोकांचा मृत्यू
Pakistan flood : पाकिस्तानात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरात मृतांची संख्या 500 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बुधवारी आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की मृतांमध्ये 98 महिला आणि 191 मुलांसह 502 लोकांचा समावेश आहे. (pakistan more than 500 people died due to floods in pakistan floods)
पाऊस आणि पुरामुळे 40,000 हून अधिक घरे आणि 2,500 किमी पेक्षा जास्त रस्त्यांचे नुकसान झाले, हजारो बेघर आणि दुर्गम गावांमध्ये अडकून पडलेत. हवामान बदलाच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील इतिहासातील सर्वात जास्त पावसामुळे बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
पूरग्रस्त भागात लहान मुलांसह लाखो लोकांना जलजन्य आजारांचा धोका आहे, जेथे लष्कर आणि बचाव यंत्रणा पोहोचून अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अलिकडच्या वर्षांत, अचानक पूर, उष्णतेच्या लाटा, ढगफुटी, दुष्काळ आणि धुके यांमुळे पाकिस्तानातील हवेची गुणवत्ता खालावली आहे.