पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक
मोठी कारवाई करत ट्विटरने पाकिस्तान सरकारचे भारतातील खाते ब्लॉक केले आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचे खाते बंद करण्यात आले आहे. कोणत्याही देशाच्या न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार किंवा योग्य कायदेशीर मागणीनुसार ट्विटर सर्व प्रकारच्या अकाउंट्सवर बंदी घालण्यास बांधील आहे.
या कारवाईबाबत भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा पाकिस्तानकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तानचे ट्विटर अकाउंट भारतात पाहण्यावर बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर खात्यावर भारतात बंदी घालण्यात आली होती.
पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल @GovtofPakistan आहे. "भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचं भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आलं आहे." असे पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलं आहे.