ताज्या बातम्या
धाराशिव नामांतरामुळे समाजात कोणतीही धार्मिक तेढ नाही; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका
धाराशिव नामांतरामुळे समाजात कोणतीही धार्मिक तेढ नाही; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका
जुलै 2022 मध्ये औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' तर उस्मानाबादचं 'धाराशिव' असं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (27 मार्च) सुनावणी पार पडली.
उस्मानाबाद नगरपरिषदेने 24 फेब्रुवारी 2023 रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेचं नाव बदलून धाराशिव नगरपरिषद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच 26 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेचं नाव बदलून यापुढे ते धाराशिव नगरपरिषद असेल अशी अधिसूचना जारी केली.
यावर आता उस्मानाबादच्या धाराशिव नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक तेढ निर्माण होणार नसल्याचा दावा राज्य सरकारने हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.