यशवंत सिन्हा विरोधी पक्षांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच शर्यत जोर धरत आहे. तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये उमेदवारी देण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु, विरोधी पक्षांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. याची अधिकृतरित्या घोषणाही करण्यात आली आहे.
यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दल त्यांनी ट्विट करत आभारही व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मला टीएमसीमध्ये मिळालेल्या आदर आणि प्रतिष्ठाबद्दल मी ममताजींचा आभारी आहे. आता वेळ आली आहे की, राष्ट्रीय हेतूसाठी पक्ष सोडून विरोधकांच्या एकतेसाठी काम करायला हवे. मला खात्री आहे की ते हे पाऊल स्वीकारतील, असे म्हणत यशवंत सिन्हा यांनी टीएमसी सोडण्याचे संकेत दिले आहेत.
तर, यशवंत सिन्हा यांच्या नावावर विरोधी पक्षांचे एकमत झाले आहे. यापूर्वी अध्यक्षपदासाठी तीन संभाव्य उमेदवारांनी स्वत:हून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनीही राष्ट्रपतीपदाची निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नकार दिला आहे.
कोण आहेत यशवंत सिन्हाय़
यशवंत सिन्हा हे दोनदा केंद्रीय अर्थमंत्री राहिले आहेत. 1990 मध्ये ते पहिल्यांदा चंद्रशेखर सरकारमध्ये आणि नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. वाजपेयी सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्रीही होते.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाची निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. तर 21 जुलै रोजी देशाचे नवीन राष्ट्रपती कोण असणार, हे निश्चित होणार आहे.