ससूनमध्ये उरले अवघे चारच कैदी; आजाराचं ढोंग घेणाऱ्या कैद्यांची येरवडामध्ये रवानगी
ससून रुग्णालयातील जेलवॉर्डमध्ये अवघे 4 कैदी उरले आहेत. उपचार घेणाऱ्या कैद्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात उपचारांची आवश्यकता नसलेल्या 12 ढोंगी कैद्यांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील दुर्घटना आणि ससून रुग्णालयातून ललित पाटील पोलिसांना फसवून पळून केल्याची घटनेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी ससून रुग्णालयाबाबत आढावा घेतला होता.
या वेळी राव यांनी विविध सेवा आणि कैद्यांचा कक्ष असे दोन स्वतंत्र अहवाल देण्याचा आदेश रुग्णालयाच्या प्रशासनाला दिला होता. शनिवारी आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषध पुरवठा याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार ससूनमध्ये शुक्रवारपर्यंत 16 कैद्यांवर उपचार सुरू होते. त्यांच्या वैदकीय तापसणी दरम्यान असे समोर आले की त्यातील केवळ 4 कैद्यानांच उपचाराची गरज आहे.