आरोग्य विभागाचा नवा उपक्रम; आता सॉफ्टवेअर करणार ट्रान्सफर पोस्टिंगचं काम
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा नवा उपक्रम सुरु होणार आहे. सॉफ्टवेअर आता ट्रान्सफर पोस्टिंगचं काम करणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ट्रान्सफर आणि पोस्टिंगसाठी ज्या कर्मचाऱ्याचा नंबर लागेल त्याचं ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केलं जाईल.
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर हे ऑनलाईन ट्रान्सफर आणि पोस्टिंग सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी वर्षानुवर्षे बदली न झालेल्या अशा कर्मचाऱ्यांची ऑनलाइन पद्धतीने बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही काम करुन एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची बदली होणार आहे, त्यांना बदलीसाठीचे पर्याय देण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सॉफ्टवेअरने काम केले राज्यातील सर्व ग्रामीण भागात आणि आरोग्य केंद्रांमध्ये अनेक डॉक्टर आणि अनेक आरोग्य कर्मचारी होते, ज्यांची अनेक वर्षांपासून कुठेही बदली झाली नव्हती. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत होता. असे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले.