ताज्या बातम्या
लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; खासगी बाजार समिती शेतकऱ्यांनी पाडली बंद
लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे.
लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. खासगी बाजार समिती शेतकऱ्यांनी बंद पाडल्याची माहिती मिळत आहे. कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.
केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय मग महाराष्ट्रावर अन्याय का? असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.