Onion महागणार? लासलगावमध्ये लिलाव आजपासून बंद
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मागण्या मान्य न झाल्यास आजपासून बाजार समित्या बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. अद्याप शासनाने कुठलाही तोडगा न काढल्याने बाजार समित्या बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारात कांदा लिलाव होणार नसल्यानं कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प होणार आहे.
कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या -
1) बाजार समितीने आकारलेले मार्केट फीचा दर 100 रुपयास 1 रुपया आहे, तो 100 रुपयास 50 पैसे करावा.
2) 38 चे दर संपूर्ण भारतात एकच 4 टक्के आडतीची वसुली विक्रेत्यांकडून करण्याची पद्धत करण्यात यावी.
3) कांद्याची निर्यात होण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्यात यावे.
4) नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून बाजार समितीच्या आवारात खरेदी करावी आणि विक्री रेशनमार्फत करावी.
5) केंद्र सरकार व राज्य सरकारला कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या व्यापारावर 5 टक्के सरसकट सबसिडी, तर व देशांतर्गत व्यापारावर 50% सबसिडी देण्यात यावी.
6) कांदा व्यापाऱ्यांची चौकशी बाजारभाव कमी असताना करावी, बाजार भाव जास्त असताना व्यापाऱ्यांची चौकशी करू नये.