लोटे एमआयडीसी स्फोटात एकाचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल
निसार शेख, रत्नागिरी: दोन दिवसांपूर्वी लोटे (ता. खेड) औद्योगिक वसाहतीमधील डिवाईन कंपनी स्फोट झाल्याप्रकरणी तिघांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये कंपनीच्या मालक श्रीमती अनुराधा मौर्य, मुलगा पियुष मौर्य व वेल्डींग वर्कर मुकादम दिपक गंगाराम महाडिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या स्फोटात संदीपकुमार परवेज सावा उर्फ गुप्ता (वय-३६) याचा एरोली येथे बर्न हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबतची फिर्याद खेड पोलीस उपनिरीक्षक सुजित जगन्नाथ सोनावणे यांनी दिली आहे. यानुसार लोटे औद्योगिक वसाहतीमधील डिवाईन कंपनीमध्ये १३ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास वेल्डींगचे काम सुरु होते. हे काम सुरू असताना कंपनीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या प्रोडक्ट तयार करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या केमिकल्सने भरलेल्या ड्रमवर ठिणगी पडली. त्यामुळे अचानक स्फोट होऊन मोठी आग लागली. यामध्ये आशिष रामलखन मौर्या, विपल्य मंडळ, संदिप कुमार परवेज सावा उर्फ गुप्ता, दिपक गंगाराम महाडिक (वय ५४, व्यवसाय वेल्डींग काम, रा. घाणेखुंट लोटे. ता. खेड), सतिश चंद्र मौर्य (वय-२७, व्यवसाय सुतारकाम रा. लोटे एमआयडीसी कालेकरवाडी ता. खेड), मयूर काशिराम खा (वय- ३२ व्यवसाय वेल्डींगकाम रा. कुरवळ-जावळी, ता. खेड) विनय मौर्य, दिलीप शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. मयूर काशिराम खाक (वय- ३२ व्यवसाय वेल्डींगकाम रा. कुरवळ-जावळी, ता. खेड), विनय मौर्य, दिलीप शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील संदीपकुमार गुप्ता याचा उपचारा दरम्यान मृत्य झाला आहे.
या स्फोटाप्रकरणी डिवाईन कंपनीच्या मालक श्रीमती अनुराधा मौर्य, पियुष मौर्य व वेल्डींग वर्क करणारा मुकादम दिपक महाडिक यांनी कंपनीमध्ये स्फोट सदृश केमिकल्सचा साठा असताना आवश्यक ती खबरदारी न घेता हयगयीचे वर्तन करून मयत व जखमी यांच्याकडून वेल्डींगचे व सुतार कामाचे काम करून घेतल्यामुळे एकाच्या मृत्यूस व अन्य सात जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.