सोनिया गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन
संजय देसाई |सांगली : काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारविरुद्धचे आंदोलन अधिक तीव्र केले आहे. सांगली मध्ये दुसऱ्या दिवशीही काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने करत आंदोलन करण्यात आले आहे.
ईडी कडून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या या कारभाराविरोधात देशभरात काँग्रेसच्यावतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारपासून काँग्रेसकडून देशभर आंदोलन करण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशीही सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन चालू ठेवला आहे.
सांगलीमध्ये हे काँग्रेसच्या वतीने सुरु करण्यात आलेला आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या स्टेशन चौक येथील गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपाकडून सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.