ठाण्यात सुरू झाले ऑलिम्पिक दर्जाचे पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी सेंटर
ठाण्यातील होतकर विद्यार्थ्यांना घडवण्याकरिता ठाणे शहरात अनेक क्रिडांगणे स्टेडिअम उभारण्यात आले आहे. परंतु प्रथमच ठाण्यात ऑलिम्पिक दर्जाचे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी सेंटर नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रासाठी महानगरपालिकेच्या रिक्रिएशन ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावर दामजी शामजी या विकासाकडून स्वर्ग कोटी रुपये खर्च करून हे प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. महापालिकेकडून यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र साकार होत असून ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रातील हे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र साकारण्यात आले आहे त्या ठिकाणी 30 मीटर आणि सातशे मीटर ऑलिम्पिक रेंज तयार करण्यात आला आहेत. सरावासाठी डेमोजी सुविधा आहे कॉन्फरन्स रूम स्टोअर रूम जिम आधी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. राज्यातील तिरंदाज खेळाडूंना सर्वात व्यासपीठ मिळावे यासाठी ठाण्यात पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रातून उत्तम तिरंदाज म्हणून आपल्या देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.