ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही; आज फैसला
ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार की आरक्षणानुसार याचा फैसला आता आज होणार आहे. याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला निवडणूक होणार होत्या. मात्र, याबाबत याचिका दाखल होताच स्थगिती देण्यात आली होती. पण आज यावर सुनावणी होणार आहे.
आरक्षणाशिवाय निवडणुका हा निर्णय निवडणुक आयोगाने घेतल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यामध्ये काय हस्तक्षेप करणार हे पहावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अन्यथा 18 ऑगस्ट रोजीच या 92 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असत्या.