BJP Leader Nupur Sharma
BJP Leader Nupur Sharmateam lokshahi

नुपूर शर्माचा फोटो डिलीट कर अन्यथा मान कापून टाकू; पुन्हा एकदा तरुणाला धमकी

देशात अनेक भागांत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळतंय.
Published by :
Sudhir Kakde
Published on

Nupur Sharma Controversy : राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलरींग काम करणाऱ्या कन्हैयालालच्या हत्येनंतर राज्यात खुनाच्या धमक्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली, दोषींवर कठोर कारवाईची मागणी झाली, मात्र दुसरीकडे अशा घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशा धमक्या देणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्यानं कारवाई केली जात असली, तरी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक कमी झाल्याचं दिसून येतंय.

वेगवेगळ्या घटना समोर येत असतानाच आता पाली जिल्ह्यात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्यानं एका व्यक्तीचा गळा चिरुन टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. हे प्रकरण जैतरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला धमकावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे आली असून, पोलिसांनी त्यानुसार कार्यवाही सुरु केली आहे. तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे की, ७ जुलै रोजी सायंकाळी त्याच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला होता. त्यानंतर मात्र फोन करणाऱ्यानं त्याला नुपूर शर्माचा डीपी काढण्यास सांगितलं. फोन करणाऱ्यानं त्याला शिवीगाळ करून, डीपीवरुन नुपूर शर्माचा फोटो काढण्यास सांगितलं. तसं न केल्यास मान कापून टाकेन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

BJP Leader Nupur Sharma
बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे 'सून'सोबत अफेअर, बलात्काराचा आरोप

दरम्यान, या तरुणाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या तरुणाच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत. व्हिडिओ कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे देखील प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com