आता टोमॅटो 50 रुपये किलोनं मिळणार, कुठे?

आता टोमॅटो 50 रुपये किलोनं मिळणार, कुठे?

महागाईचा वाढता आलेख थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महागाईचा वाढता आलेख थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महागाई वाढतच चालली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. मात्र आता दिलासादायक आहे ते म्हणजे सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर टोमॅटो ५० रुपये किलोनं विकण्याची घोषणा केली आहे.

काल १४ ऑगस्टपासूनच दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची विक्री सुरू करण्यात आली आहे. एनसीसीएफ आणि नाफेडने काही दिवसांपूर्वी ९० रुपये प्रतिकिलो दराने विकण्यास सुरुवात केली होती. देशातील अनेक भागात स्वस्त दरात टोमॅटो मिळत आहे.

केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ आणि नाफेडला टोमॅटो ५० रुपये किलोनं विकण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com