Nobel Prize in Physiology or Medicine to Victor Ambrose and Gary Ruvkun
Nobel Prize in Physiology or Medicine to Victor Ambrose and Gary Ruvkun

Nobel Prize 2024: व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

'मायक्रोआरएनएच्या (microRNA) शोधासाठी आणि पोस्ट-ट्रान्सक्रिप्शनल जनुक नियमनात त्याची महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी' शास्त्रज्ञ व्हिक्टर एम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकुन (Gary Ruvkun) यांना नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

यंदाच्या शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 'मायक्रोआरएनएच्या (microRNA) शोधासाठी आणि पोस्ट-ट्रान्सक्रिप्शनल जनुक नियमनात त्याची महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी' शास्त्रज्ञ व्हिक्टर एम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकुन (Gary Ruvkun) यांना नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या नोबेल असेंब्लीद्वारे औषधासाठी विजेत्यांची निवड केली जाते आणि त्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्राऊन्स ($1.1 दशलक्ष) बक्षीस रक्कम म्हणून मिळते. शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो.

डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार तयार केलेले, 1901 पासून विज्ञान (Science), साहित्य (Literature) आणि शांतता (Peace) प्रस्थापित करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. त्यानंतर यामध्ये अर्थशास्त्र शाखेचा समावेश करण्यात आला आहे.

व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन या अमेरिकन शास्त्रज्ञांना का मिळणार नोबेल?

समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार, विक्टर एम्ब्रोस आणि गैरी रुवकुन यांना मायक्रोआरएनचा शोध आणि पोस्ट-ट्रान्सक्रिप्शनल जनुक नियमनात त्याची महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी' नोबेल जाहिर करण्यात आला आहे. त्यांच्या या विस्मयकारी शोधामुळे जनुक नियमनातील एका नव्या शाखेची ही नांदी ठरू शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com