राज्याला २८ हजार ७०० मेगा वॅट विजेची गरज - नितीन राऊत
सध्या राज्यात लोडशेडिंग करण्याची वेळ आली आहे. आम्ही CGPL कंपनीकडून अतिरिक्त वीज विकत घेत असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin raut) यांनी दिली. सध्या राज्याला २८ हजार ७०० मेगा वॅट विजेची गरज आहे. जूनपर्यंत ३० हजार मेगावॅट जाणार असल्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे. आज राज्यमंत्री मंडळाची विशेष बैठक झाली. राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी या बैठकीत आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलाय.
वीजनिर्मितीसाठी एका दिवसाला 1 TMC पाणी लागते. त्यानुसार 17 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारनियम वाढण्याची शक्यता ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने टाटा कंपनीच्या सीजीपीएल कडून 760 मेगा wat वीज खरेदी करणार आहे.या मुद्रा येथील प्रकल्पाबाबत एक करार केला होता. त्यानुसार, साडेतीन रुपये प्रतियुनिट वीज मिळणार होती. मात्र, आता देशात कोळशाचा प्रचंड तुटवडा आहे.
अशा परिस्थिती कंपनीला कोळसा आयात करावा लागत आहे. त्याचे दर अधिक आहेत. त्यामुळे सहा रुपये दराने वीज देण्यास कंपनीने अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, साडेतीन रुपयांऐवजी सहा रुपये दराने वीज खरेदी करण्याबाबतचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाला घ्यावा लागणार आहे.