Nitin Gadkari
Nitin GadkariTeam Lokshahi

Gadkari : पुल कसा पडला ? : IAS वाऱ्यामुळे पुल पडला

Published by :
Team Lokshahi
Published on

नितीन गडकरी - पुल कसा पडाला

आयएएस- जोरदार वाऱ्यामुळे पुल पडला

एखादा पुल जोरदार वाऱ्यामुळे पडावा, असे उत्तर केंद्रीय मंत्र्यांना एखाद्या कार्यकर्त्याने नाही तर चक्क आयएएस अधिकाऱ्याने दिले. या उत्तरानंतर गडकरी यांना धक्का बसला. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी हा किस्सा सांगितला.

बांधकामाधीन असलेल्या एका पुलाचा काही भाग २९ एप्रिल रोजी बिहारमध्ये कोसळला. नितीन गडकरी यांनी या दुर्घटनेचं कारण विचारलं असता IAS अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तराने नितीन गडकरी (Nitin Gadkari) अवाकच झाले.

एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, "बिहारमध्ये एक पूल कोसळला. मी सचिवांना पूल कोसळण्याचे कारण विचारले. त्यांनी उत्तर दिले की, जोरदार वारा आला आणि कोसळला. तेव्हा मी म्हणालो की, तुम्ही आयएएस अधिकारी आहात, तुमचा अशा गोष्टीवर विश्वास आहे." वाऱ्यामुळे पूल कसा कोसळेल, हे मला समजू शकत नाही. काहीतरी चूक झाली असावी, ज्यामुळे हा पूल पडला, असे गडकरी यांनी सांगितले.

खर्च कमी करा पण...

गुणवत्तेशी तडजोड न करता पुलांच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यावर भर दिला पाहिजे, असे गडकरी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांनी गुणवत्तेशी तडजोड न करता पुलांच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यावर भर दिला. बिहारमधील सुलतानगंज आणि अगुआनी घाट दरम्यानच्या या पुलाचे बांधकाम 2014 साली सुरू झाले. त्याचे बांधकाम 2019 मध्येच पूर्ण होणार होते, परंतु अद्याप ते पूर्ण झालेले नाही

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com