Nitin Gadkari
Nitin GadkariTeam Lokshahi

शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढणार तेवढं सांगा; गडकरींचा पुन्हा कृषी विद्यापीठांवर निशाणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि ऍग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली.
Published by :
Sudhir Kakde
Published on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर नंतर पुन्हा अमरावतीत कृषी विद्यापीठावर निशाना साधला. एकरी 30 क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे, पण मला एकरी 5 क्विंटलच्यावर सोयाबीन झालं नाही. तुम्ही हे करत असाल तर सांगा नाही तर तुमचा उपयोग काय? असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. कृषी विद्यापीठावर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढणार हे आह्मांला सांगा असं आव्हान नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठाला यावेळी केलं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि ऍग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली. यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक आणि जैविक शेतीकडं वळणं सध्या गरजेचं आहे. यासोबत विदर्भातील शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणं गरजेचं असून यातून एकमेकांना सहाय्य करणं गरजेचं आहे. तरच यशस्वी शेतकरी बनू शकतो असं गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू, मात्र उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा

यासोबतच एकरी 102 टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील त्यांनी कौतुक केलं. शेती करताना उत्पादन खर्च कमी आणि व्हॅल्यूएडिशन करणे त्यासोबतच उत्तम पॅकेजिंग करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्रव्ह्युहात मार्गदर्शन घेऊन शेती केल्यासच शेती उत्तम ठरू शकते. विविध प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. यातून चांगलं उत्पादन देखील होऊ शकतं. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही असं वक्तव्य देखील गडकरी यांनी केलं. मराठवाड्यासारखी फळे, भाजीपाला उत्पादन देखील विदर्भात चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. याला केवळ शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करणं आणि मेहनतीची गरज आहे. असं झाल्यास विदर्भ देखील मागास राहणार नाही. आणि भारत देश कृषी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com