दिल्लीत आज नीती आयोगाची बैठक पार पडत आहेत. या बैठकीसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे चार राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेनऊ वाजता या बैठकीचे उद्घाटन करणार आहेत.
या बैठकीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत सामिल होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.