Nitesh Rane: जिथे कॉंग्रेसचं सरकार असणार, तिथे हिंदूचं जगणं कठिणं होणारं! नितेश राणेंचं कॉंग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले...
कर्नाटकमधून सुरु असलेल्या एका वादामध्ये हिंदूत्ववादी संघटना गणपतीची मुर्ती घेऊन आंदोलन करत होते आणि तिथल्या पोलिसांनी त्यांच्याकडून ती मुर्ती जप्त केली. त्या घटनेवरून अनेक ठिकाणी कॉंग्रेसवर हल्लाबोल होत आहे. अनेक ठिकाणावरून कॉंग्रेसवर बहिष्कार देखील टाकण्यात आला आहे. यावर नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
याचपार्श्वभूमीवर नितेश राणे म्हणाले की, "जिथे जिथे राज्यात, देशात कॉंग्रेसचं सरकार असेल, तिथे तिथे हिंदूचं जगणं मुश्किल आहे". मग तेलंगणा असो, कर्नाटक असो जिथे कॉंग्रेसच्या विचारांचा मुख्यमंत्री आहे, तिथे हिंदूंना जिवंत ठेवू नये असा कदाचित फतवाच काढला आहे का? असा संशय आम्हाला यायला लागलेला आहे. म्हणजे थेट गणेशाची मुर्तीच आम्ही त्या पोलिसांच्या व्हॅनमध्ये पाहिली आहे. पाकिस्तानचे झेंडे फडकवताना कॉंग्रेसला आम्ही पाहिलेलं आहे. पाकिस्तानचे झेंडे सगळीकडे लावत असताना आम्ही पाहिलेलं आहे. मंदिरांच्या समोर धिंगाणा घालत असताना पाहिलेलं आहे.
लव्ह जिहादचे कायदे रद्द होत असताना आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पण कर्नाटकमध्ये होत असणाऱ्या घटनेला फार बारकाईने हिंदू समाजाने बघाव कारण, कर्नाटकमध्ये झालेली घटना उद्या आपल्या महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या विचारांचं सरकार चुकून आलं तर आपल्या महाराष्ट्रात पण अशी घटना होऊ शकते. आम्ही जे वारंवार प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलतो की, हिंदूचे सण आणि हिंदूची जी काही संस्कृती आहे ती कॉंग्रेसचं सरकार आल्यानंतर सगळ काही बंद होतील. कॉंग्रेसच्या सरकारमध्ये हिंदूंना घरात पण पुजा करण्याची परवानगी मिळेलं का? आता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे.