ताज्या बातम्या
ताईंनी काळजी करु नये; आम्ही पवार साहेबांची काळजी नक्की घेऊ - नितेश राणे
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. लवकरच तुझा दाभोळकर होईल असे लिहित धमकी देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, ताईंना मी सांगेन तुम्ही एवढी चिंता करु नका. आमचं सरकार आहे. आदरणीय पवार साहेबांची जेवढी काळजी घ्यायची तेवढी आम्ही नक्की घेऊ. त्याची चिंता नको. असे नितेश राणे म्हणाले.