सांगलीच्या नऊ वर्षांच्या प्रांजल बावचकर या चिमुरडीने सर केला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला मोरोशीचा भैरवगड
संजय देसाई, सांगली : गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील कोणता गड सर्वात अवघड आहे हा विषय निघाला की सर्वच ट्रेकर्सच्या मनात एकच नाव येते मोरोशीचा भैरवगड. मात्र हा अवघड किल्ला सांगलीच्या प्रांजल सचिन बावचकर या अवघ्या 9 वर्षाच्या चिमुरडीने सर केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे निवृत्त वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ उदय जगदाळे यांची नात तर प्रसिद्ध दंततज्ञ डॉ कल्याणी जगदाळे बावसकर आणि सह्याद्री व्हेंचर्सचे सचिन बावसकर यांची ती कन्या आहे.
सांगलीमधील सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपने नुकताच मोरोशीचा भैरवगड ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला, यामध्ये 20 ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. याच ग्रुपमध्ये होती एक नऊ वर्षाची चिमूरडी प्रांजल बावचकर मोरोशीचा भैरवगड चढताना गिर्यारोहकाच्या मनाचा भक्कमपणा आणि शरीराची ताकद या दोन्हीचा कस लागतो. हा काळा निर्भीड कातळ उतरताना साधारणपणे 300 फुटांचे रॅपलिंग करावे लागते. असा हा अवघड थरारक पण गिर्यारोहकांना मोहात टाकणारा मोरोशीचा भैरवगड सर केला सांगलीतील अवघ्या नऊ वर्षाच्या प्रांजल बावचकर या चिमुरडीने पार केला आहे.
सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रूपतर्फे प्रांजल वयाच्या पाचव्या वर्षापासून गिर्यारोहण करते. आजपर्यंत तिने 25 हून अधिक गड-किल्ले आणि जंगलभ्रमंती ट्रेकिंग केलेले आहेत. मोरोशीचा भैरवगड सारखा थरारक गड सुद्धा प्रांजल ने हरनेस, कॅरबल व रॅपलिंगचा सपोर्ट घेवून लीलया पूर्ण केला. यामध्ये तिला तिचे वडील व सह्याद्री व्हेंचर्सचे संस्थापक श्री. सचिन बावचकर यांचे मार्गदर्शन मिळाले.