"दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, तुम्ही..."; भाजपच्या निलेश राणेंची खरपूस टीका

"दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, तुम्ही..."; भाजपच्या निलेश राणेंची खरपूस टीका

एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलंय, मात्र दुसरीकडे राणे, सोमय्या यांचे टिकेचे बाण सुरुच आहेत.
Published by :
Sudhir Kakde
Published on

"दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका." असं ट्विट माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पूत्र निलेश राणेंनी केली आहे. राज्यात सध्या युतीचं सरकार आलेलं असून, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातलं हे सरकार अडीच वर्ष टीकेल, पुढच्या विधानसभेत 200 जागा निवडून आणू असा विश्वास भाजप आणि शिंदे गटाकडून व्यक्त केला जातोय. मात्र दुसरीकडे टीका टिपण्यांचं हे सत्र संपता संपण्याचं नाव घेईना. भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावर निलेश राणेंनी केलेल्या या टिकेचे आता काय परिणाम होतात, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

"दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, तुम्ही..."; भाजपच्या निलेश राणेंची खरपूस टीका
CM शिंदेंनी निवडणूक आयोगापासून संपत्ती लपवली; पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती पटली नाही, उद्धव ठाकरे वेळ देत नाही, त्यांच्या आजुबाजूची लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही अशी अनेकल कारणं देत शिवसेनेतले तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत पक्षाबाहेर पडले अन् भाजपसोबत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला. राज्यात मागच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांपासूनच शिवसेनेमध्ये अस्वस्थतेच्या, नाराजीच्या लाटा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर या लाटा एवढ्या तीव्र झाल्या की, यामुळे शिवसेना (Shiv Sena) फुटली आणि परिणामी महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकारच कोसळलं. त्यानंतर आता राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकार अस्तित्वात आलं. युतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी शिवसेनेवर वारंवार टीका करणारे राणे कुटुंबीय मात्र अजूनही माघार घेताना दिसत नाहीये. त्यामुळे आता दिपक केसरकर यावर नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com