ताज्या बातम्या
भाजप नेते निलेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेबाबत उपस्थित केले गंभीर प्रश्न; म्हणाले...
सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला.
सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. याच पार्श्वभूमीवर आता निलेश राणे यांनी ट्विट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केलं आहेत.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो???
यासोबतच ते पुढे म्हणाले की, जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी. असं निलेश राणे म्हणाले.