हिंदू धर्माच्या सणासाठी अडीच वर्षात शहाजी बापू सारख्या योध्यांनी महाराष्ट्रमधून कोरोना घालवला : निलेश राणे
संजय देसाई, सांगली
हिंदू धर्माच्या सणासाठी अडीच वर्षात शहाजी बापू सारख्या योध्यांनी महाराष्ट्र मधून कोरोना घालवला आहे. आणि अडीच वर्षानंतर हे सण साजरे होत आहे. असा टोला उद्धव ठाकरे यांना निलेश राणे यांनी लगावला. ते सांगलीच्या पलूस येथे दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.
सांगलीच्या पलूस मध्ये भाजप तर्फे दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार निलेश राणे, आमदार शहाजी बापू पाटील, आणि भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अदाकारीने सांगलीच्या पलूस येथील जनतेला मंत्रमुग्ध केले. भाषणाला उभे राहिल्यानंतर निलेश राणे म्हणाले तुम्ही वेगळ्या मूड मध्ये आहात. खरतर मानसी नाईक यांना बघितल्या नंतर तुम्ही माझे काय घंटा ऐकणार आहात. पण हा डीजे सुद्धा राणेंसारखा आहे. थांबतच नाही. तसेच पुढे म्हणाले, शहाजी बापू शाहरूख एवढी तुमची क्रेझ महाराष्ट्रामध्ये आहे. एकदा तुम्हाला कोकणात पण यावं लागेल. झाडे डोंगर तिकडचे पण दाखवतो.
हिंदू धर्मासाठी असे सण मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे म्हणून महाराष्ट्रातून अडीच वर्षात कोरोना घालवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना हिंदू धर्माचे सण असेच मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहिजेत.