रिफायनरी प्रकल्पावरून रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवला
रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवला असून महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केलाय. रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात पोहचलेत. तसेच आम्ही चर्चेसाठी तयार . ग्रामस्थांनी निलेश राणे यांचा ताफा अडवल्यानंतर राणे समर्थकांकडून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतर निलेश राणे यांनी हात जोडून ग्रामस्थांची माफी मागितली. ”जर आमच्यापैकी कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो”
यासोबतच “आपण जो विरोध करत आहात यातून लोकशाही मार्गाने मार्ग काढावा लागेल. मात्र, तुम्ही जो शिविगाळ केल्याचा आरोप करत आहात, जर कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो. तसेच आमच्या लोकांना समज देतो. तुम्ही आमची माणसं आहात. तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत. मात्र, चर्चेने मार्ग निघू शकतो. त्यामुळे कृपा करून हा विषय चिघळू देऊ नका, शांत व्हा असे त्यांनी तेथील आंदोलन करणाऱ्या नागरिकांना सांगितले.