बारामतीत नाट्यमय घडामोडी! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर रात्री सर्च ऑपरेशन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी अचानक सर्च ऑपरेशन करण्यात आलं आहे.
शरयू टोयोटा हे श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं आहे. मात्र, सोमवारी रात्री अचानक निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून शरयू टोयोटा येथे सर्च ऑपरेशन केलं. मात्र, तपासादरम्यान काहीही संशयास्पद सापडले नसल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
युगेंद्र पवार यांच्याविरोधात तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन रावबिले. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. यावेळी श्रीनिवास पवार यांच्या केबिनची तपासणीही पोलिसांकडून करण्यात आली होती.
श्रीनिवास पवार हे बारामतीत प्रस्थापित उद्योजक आहेत. त्यांचा मुलगा युगेंद्र पवार आगामी निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात आपला काका उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहे. या पार्श्वभूमीवर शरयू मोटर्समध्ये झालेल्या तपासामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.