Maharashtra Political Crisis: 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये- Supreme Court
राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड हे या घटनापीठाचे अध्यक्ष आहेत. आज सकाळी साडे दहा वाजता या सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी सुरू झाली. 23 ऑगस्ट 2022 रोजी याप्रकरणाची सुनावणी झाली होती. परंतु, त्यानंतर या सुनावणीबाबत सातत्याने पुढील तारखा देण्यात होत्या. आता पुढील सुनावणी ही 27 सप्टेंबर रोजी होणार आहे
सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं?
घटनापीठासमोरची पहिली सुनावणी झाली
आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार
२७ सप्टेंबरला दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातील
आज कोणताही अंतरिम निर्णय झालेला नाही
सदस्यांच्या अपात्रतेवर २७ सप्टेंबरला १० मिनिटे सुनावणी होणार
२७ सप्टेंबरला थोडक्यात सुनावणी घेऊन निर्णय होणार
तिन्ही पक्षांनी प्रत्येकी एका पानावर आपली भूमिका मांडण्यास सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे