Akola ambulance issue
Akola ambulance issue team lokshahi

अकोल्यात रुग्णवाहीके अभावी नवजात शिशूचा मृत्यू

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Published by :
Shubham Tate
Published on

अकोला (अमोल नांदूरकर) : - अकोल्यातील तेल्हारा तालुक्याच्या दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पिंपरखेड येथील रहिवासी मिना लखन शेलुकर यांना रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांची घरीच प्रसुती झाली. नवजात शिशूचे वजन कमी असल्याने तातडीने उपचाराची गरज असताना वेळेवर उपचार न झाल्याने उपचाराअभावी नवजात शिशूचा मृत्यू झाला. (Newborn baby dies in Akola due to lack of ambulance)

Akola ambulance issue
अंधश्रद्धेच्या आहारी गेला आणि 56 लाखाना बुडाला, सुशिक्षित डोंबिवलीतील घटना

ही घटना 26 जूनला घडली आहे. यामुळे आरोग्य विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी लखन श्रीराम शेलुकर यांच्या पत्नीच्या पोटात प्रसुतीच्या कळा 26 जूनच्या पहाटेच्या तीन वाजता पासूनच सुरु झाल्या होत्या. तेथील आशा सेविका यांनी रुग्ण वाहिका मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांची घरीच प्रसुती झाली. आणि ही दुर्दैवी घटना घडली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com