आता मुंबई पुणे-प्रवास अधिक सुखकारक होणार आहे. कारण या रेल्वे प्रवाशांचा एक तास वाचणार आहे. राज्याला पहिली 'वंदे भारत ट्रेन' (vande mataram express train)मिळणार आहे. ही रेल्वे मुंबई आणि पुणे दरम्यान चालवण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-पुणे (Mumbai-pune)प्रवास फक्त अडीच तासात होणार आहे.
राज्याला येत्या 15 ऑगस्टपर्यंत 2 गाड्या वंदे मातराम रेल्वे मिळणार आहे. ही रेल्वे 160 किमीच्या वेगाने धावणार आहे. सध्या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून (Train)प्रवास केला तर आपल्याला मुंबई-पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. परंतु वंदे भारत ट्रेनमुळे हा प्रवास अडीच तासावर येणार असल्याने प्रवाशांचा एक तास वाचणार आहे.
रेल्वेने निविदा काढल्या
भारतीय रेल्वेने निविदा जारी केली आहे. त्यानुसार देशांत 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याची तयारी सुरु केली आहे. या निविदेत ट्रेनचे डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्सचे नियोजनही दिले आहे. या ट्रेनच्या अपग्रेडेशनचे काम महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत होत आहे. यानंतर हे काम चेन्नईतही केले जात आहे.
किती असणार भाडे
वंदे मातरम रेल्वेचे तिकीट शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा दीड पट जास्त असणार आहे. तसेच एग्जिक्यूटिव क्लासचे भाडे शताब्दीच्या फर्स्ट क्लासपेक्षा 1.4 पट अधिक असणार आहे.
वंदे भारत लांब पल्ल्याची योजना
वंदे मातरम ट्रेन आता मध्यम आणि लांब पल्ल्यांसाठी चालवली जाणार आहे. लांबचा प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ट्रेनमध्ये अप स्लीपर कोच देखील आहे. रेल्वेने या संदर्भात एक निविदा जारी केली आहे, ज्याची अंतिम तारीख 26 जुलै 2022 आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड एसी आणि थर्ड एसी सुविधा उपलब्ध असतील. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे बसवण्यात येणार आहेत.