मुंबई-पुणे  प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा; प्रवास होणार फक्त  20 ते 25 मिनिटांचा

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा; प्रवास होणार फक्त 20 ते 25 मिनिटांचा

मुंबई-पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यां प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई-पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यां प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने 1092 कोटी रुपये खर्चून यासाठी 4.5 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.2025 पासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सिग्नलमुक्त करण्यात येणार आहे. हा कॉरिडॉर शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जोडला जाणार आहे.

सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. मात्र आता या बांधकामामुळे हा प्रवास 20 ते 25 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. 2023 च्या अखेरीस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल. वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. या समस्येवर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

4.5 किमी लांबीच्या कनेक्टरच्या बांधकामासाठी सुमारे 1092 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे इंधनाची मोठी बचत होणार असून वाहनचालकांच्या वेळेचीही बचत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com