ताज्या बातम्या
New Parliament Building Inauguration : संसद भवन उद्घाटनाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन आता भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मात्र नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती मात्र अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.