New Labour Code
New Labour Code team lokshahi

आठवड्यातून चार दिवस काम, तीन दिवस सुट्टी? तुमच्या पगारावर होणार थेट परिणाम

मोदी सरकार हा नियम 1 जुलैपासून करणार लागू?
Published by :
Shubham Tate
Published on

New Labour Code : मोदी सरकार (Modi government) नवीन कामगार कायदा आणणार आहे. 1 जुलै 2022 पासून अंमलात आला तर आठवड्यातून फक्त चार दिवस काम करावे लागेल. तसेच तुमचे पीएफ (PF) योगदान देखील वाढेल. मात्र हा नियम लागू झाल्यानंतर पगार कमी होणार आहे. जाणून घेऊया नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर काय बदल होतील? (new labour code salary working hours pf contribution may change from 1st july)

New Labour Code
IRE vs IND: भुवनेश्वर कुमारने मोडला विश्वविक्रम

आठवड्यातून तीन दिवस सुट्टी!

आठवड्यातून तीन दिवस सुटी असावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर आठवड्यातून केवळ 4 दिवस काम करावे लागणार आहे. परंतु दिवसातील कामाचे तास 9 वरून 12 पर्यंत वाढवले ​​जातील. कंपनीने 12 तासांच्या कामाची शिफ्ट लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी द्यावी लागेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 48 तास काम करावे लागणार आहे. 12 तासांच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना दिवसातून दोनदा अर्ध्या तासाची रजा मिळेल.

New Labour Code
'ही' 1 रुपयाची नोट तुम्हाला काही मिनिटांत करोडपती बनवेल; जाणून घ्या कसे?

नवीन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?

नवीन कामगार संहितेनुसार कर्मचार्‍यांचा एकूण पगार मूळ पगाराच्या 50% किंवा त्याहून अधिक असावा. असे झाल्यास तुमचा पीएफ वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी बचत होणार आहे. हातातील पगार कमी केला जाईल. मात्र, नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर पेन्शनची रक्कमही वाढणार आहे. याशिवाय वैद्यकीय विमा, प्रोत्साहनांमध्येही वाढ होऊ शकते.

याआधी 1ऑक्टोबर 2021 रोजी लागू होणार होता. मात्र त्यानंतर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पाहता केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. 1 जुलैपासून सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते, असे मानले जात आहे. अंमलबजावणीबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com