एअर लाईन्स कंपन्यांचा नवा फतवा, एकच बांगडी आणि पूर्ण टक्कल....
एअर होस्टेससाठी आता एअर इंडियाने नवीन नियम लागू केले आहेत. टाटा ग्रुपने एअर इंडिया कंपनी विकत घेतल्यानंतर त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. यातच आता आणखी काही गणवेशासंबंधी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
या नियमांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी काही नियम करण्यात आले आहेत. यात ज्या महिला कर्मचाऱ्यांना कपाळावर टिकली लावायची असेल तर त्या टिकली लावू शकतात. मात्र या टिकलीचा आकार हा 0.5 सेंटीमीटर असला पाहिजे. मोत्यांच्या, नक्षीदार बांगड्या, अंबाडा घालू नये तर पुरुषांसाठीचे नियम म्हणजे जर पुरुष कर्मचाऱ्याला टक्कल पडले असेल तर त्याने पूर्ण टक्कल करावे. कामावर नसताना गणवेश परिधान करु नये.
आणखी काही नियम असे आहेत की, केसात पिना लावायच्या असतील तर चारच पिना लावाव्यात, अंगठी घालायची असेल तर दोन हातात एक एक अंगठीच घालावी. ती अंगठीपण एकसेंमीपेक्षा रुंद नसावी.पायातील मोजे देखील त्वचेच्या रंगाचेच असले पाहिजे. असे सर्व नवीन नियम नव्या व्यवस्थापनाने दिले आहेत.