ताज्या बातम्या
Neet Exam result : नीट परीक्षेचा निकाल केंद्र, शहरनिहाय जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. लवकरच समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. नीटबाबत सुप्रीम कर्टात उद्या सुनावणी आहे. एनटीएकडून निकाल जाहीर झाल्यानंतर समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. वेळापत्रक आणि श्रेणानुसार उमेदवार अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील.
सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला केंद्र आणि शहरनिहाय नीट युजी 2024 परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. नीट परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार निकाल जाहीर करण्यात आला.
एनटीने नीट युजी परीक्षेचा निकाल आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. नीटचा निकाल पाहण्यासाठी neet.nta.nic.in आणि nta.nic.in किंवा Exams.nat.ac.in या वेबसाईटला भेट द्या.