'संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलायचे असेल तर...' नीलम गोऱ्हे यांचे विरोधकांना आव्हान

'संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलायचे असेल तर...' नीलम गोऱ्हे यांचे विरोधकांना आव्हान

संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलायचा असेल तर अगोदर ज्याचे नाव होते त्याला थडग्यातूनवर यावं लागेल, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी विरोधकांना उद्देशून केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलायचा असेल तर अगोदर ज्याचे नाव होते त्याला थडग्यातूनवर यावं लागेल, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी विरोधकांना उद्देशून केली आहे. काही दिवसापूर्वी एका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संभाजीनगरचे बदललेले नाव पुन्हा बदलण्याची भूमिका घेतली होती यावर डॉक्टर गोरे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

त्या म्हणाल्या की, आमच्या सरकारचे इरादे नेक आहेत, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना जाहीर करत नाही अशा कान पिचक्याही डॉक्टर गोऱ्हे यांनी विरोधकांना दिल्या आहेत. महायुतीकडून गुणवत्ता असणाऱ्या महिलांनाच उमेदवारी दिली जाईल असेही डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आगामी निवडणुकीत हिंदुत्व मुद्द्याबाबत गोरे यांनी यु टर्न घेत निवडणूक लागु दे मग राष्ट्रहित आणि राज्यहित याच्यावर आम्ही ठाम राहू, असे नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com