एनडीआरएफ पथकाला 40 तासानंतर आले यश; परसोडी शिवारात नदीपात्रात आढळला मृतदेह

एनडीआरएफ पथकाला 40 तासानंतर आले यश; परसोडी शिवारात नदीपात्रात आढळला मृतदेह

जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कार धरणाच्या ओव्हरफ्लो प्रवाहात दोन दिवसांपूर्वी एक युवक वाहून गेला होता.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भूपेश बारंगे | वर्धा : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कार धरणाच्या ओव्हरफ्लो प्रवाहात दोन दिवसांपूर्वी एक युवक वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आज परसोडी शिवारात नदीपात्रात एनडीआरएफ पथकाला आढळून आला. 40 तासानंतर युवकांचा मृतदेह आढळून आल्याने सुटकेचा श्वास सुटला.

मृतक युवक अजय सलामे वय 22 रा. खराळा, ता. नरखेड, जिल्हा नागपूर येथील युवक रविवारी मित्रांसोबत कार धरण बघण्यासाठी आले होते. कार धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. अशातच रविवारी मित्रांसोबत आलेला युवक वाहून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना घडल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मात्र मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाण्याचा प्रवाह असल्याने युवक मिळू शकला नाही.

दुसऱ्या दिवशी नागपूर एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर युवकांचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता युवक मिळू शकला नाही. आज मंगळवारी धरणापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत युवकांचा शोधकार्य सुरू केले असता आज सकाळी11 वाजताच्या दरम्यान परसोडी शिवारात नदीपात्रात मृतदेह आढळून आला. अजय सलामे हा युवक मच्छी पकडत असताना वाढत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी स्थानिकांनी युवक वाहत जात असताना व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मच्छी पकडण्याचा नाद पर्यटकांच्या जीवावर बेतला!

कार धरणाच्या ओव्हरफ्लो प्रवाहात मच्छि पकडण्याचा मोह आवरला नाही. मच्छी पकडण्याचा नाद प्रवाहाच्या पाण्यात केला. पाण्याच्या वाढत्या प्रवाहमुळे युवक वाहून गेला. मच्छी पकडण्याचा नाद एकप्रकारे जीवावर बेतला. अशातच या धरणावर पर्यटक गर्दी करत आहे. मात्र जीवावर बेतणारा प्रकार या ओव्हरफ्लो स्थळी करू नये एवढंच!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com