निलेश लंके अत्यंत कष्ट करणारी व्यक्ती, त्यांचं मी पक्षाच्या कार्यालयात स्वागत करतो - शरद पवार
"अत्यंत कष्ट करणारी व्यक्ती म्हणून निलेश लंकेंकडे पाहतो. त्यांनी पारनेर मतदार संघातील कामे प्रामणिकपणे केली. विधानसभेला लंकेंच्या प्रचाराला मी गेलो होतो. त्यांना काही गोष्टी लागल्या तर आम्ही त्यांना नेहमीच मदत करणार. लंकेंची बांधिलकी जनतेशी होती. पक्षाच्या कार्यालयात मी त्यांचं स्वागत करतो", अशी मोठी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आमदार निलेश लंकेंची अतिशय जिव्हाळ्याने भेट झालीय. सामान्य माणसांचा आपला नेता म्हणून ते लोकप्रिय आहेत. निलेश लंकेंना पवारांच्या नेतृत्वाचं आकर्षण आहे. पवार साहेबांची विचारधारा त्यांनी कायम स्विकारली आहे. निलेश लंके सामान्य माणसाचा नेता आहेत. निलेश लंके शरद पवार यांच्यासोबत सामाजिक काम करणारा नेता आहेत. लंके नगर जिल्ह्यात लोकप्रिया नेता आहेत. पवार साहेंबाच्या विचारधारेवर काम करणारे नेते आज त्यांना भेटायला आले.
तसेच पत्रकार परिषदेत निलेश लंके यांनीही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं, ते म्हणाले, देशात ज्या विकासाच्या गोष्टी आहेत, त्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. मी पवार साहेबांच्या विचारधारेसोबतच आहे. कोरोना काळातल्या हृदयस्पर्षी घटना मी विसरू शकत नाही. पवार साहेबांच्या नावाने रुग्णवाहिका सुरु केली. विचारधारा आणि पक्ष एकच आहे. पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही. खासदारकी संदर्भात अद्याप चर्चा नाही. अमोल कोल्हेंचे आणि आमचे आधीपासूनच भावासारखे संबंध आहेत. साहेबांच्या विचारमंचावरून दुसऱ्या विचारमंचावर जाणं सोपं नाही. मी कालही शरद पवार साहेबांसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार.