NCP SP: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी SPचं आंदोलन

NCP SP: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी SPचं आंदोलन

बदलापूर घटनेचा राजकीय पक्षांकडून निषेध. SITच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर.
Published by :
Team Lokshahi
Published on

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक आत्याचाराची घटना घडली. या घटनेचे सर्वच ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना तसंच राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध करण्यात येतोय.

अशातच आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे. नाशिकच्या शालिमार परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलनावेळी तोंडावर आणि हातावर काळी पट्टी बांधून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन कॉंग्रेसच्या धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव आणि जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे.

तसंच या घटनेप्रकरणी SITने शाळेवर गुन्हा दाखल केला असून मुंबई उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. तर शाळा व्यवस्थापनाविरुद्ध SITने गुन्हा दाखल केला आहे. तसंच SITच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिडीत मुलींवर दहा ते पंधरा वेळा लैंगिक आत्याचार झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच मुलीच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाल्याचंही अहवालातून समोर आलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com