राष्ट्रवादीचं पुढं काय करायचं, आता समितीने ठरवायचे, शरद पवारांनी सुचवली काही नावं
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले गेले असल्याचे म्हटले जात आहे. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी या पुस्तकात भाष्य केल्याचे बोलले जात आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवारांकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असे शरद पवार म्हणाले. आता राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष कोण ? पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी नेमकं कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी. आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केलं.
त्यावेळी त्यांनी सांगितले की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ इतर सदस्य : फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रे सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस. हे सदस्य त्या समितीत असावेत, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या.