महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मोदी सरकार..."
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अजूनही खलबतं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचं काय चालू आहे? गद्दारी कशी झाली? लोकांनी एक-दुसऱ्याच्या पाठित खंजीर कसं खुपसलं? या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. वाढत्या महागाईला मोदी सरकारच जबाबदार आहे, असं म्हणत आव्हाडांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
आव्हाड माध्यमांशी बोलताना पुढं म्हणाले, बैठकीत निवडणूक प्रचार कसा व्हावा, कुठल्या विषयांवर व्हावा, कोणता विषय टार्गेट करावा, यावर चर्चा झाली. तसंच आपला प्रचार सकारात्मक असला पाहिजे. त्यामध्ये नकारात्मक बाबी नसाव्यात. सांगली आणि भिवंडी या दोन जागेवर तिढा कायम आहे, यावर बोलताना आव्हाड म्हणाले, आम्ही एकत्र प्रचार कसा करायचा, याबाबत चर्चा केली.
पुढील दीड-दोन महिन्यातला प्रचार कसा असावा, मुद्दे काय असावेत, यावर खलबतं झाली. वाढत्या महागाईला मोदी सरकारच जबाबदार, अशाप्रकारचा नारा बैठकीत लावण्यात आला. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचं काय चालू आहे. गद्दारी कशी झाली, लोकांनी एक-दुसऱ्याच्या पाठित खंजीर कसे खुपसले. तसे मुद्दे प्रचारात आणता येतील. याबाबत चर्चा झाली, असंही आव्हाड म्हणाले.