जामीन देणारे गुन्हे दाखल असताना मला आत कसा बसवता येईल यासाठी दबाव टाकण्यात आला - जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती. त्यांनतर जितेंद्र आव्हाडांकडून जामिनासाठी अर्ज दाखल त्यावर आता सुनावणी झाली असून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आव्हाडांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जामीन देणारे गुन्हे दाखल असताना मला आत कसा बसवता येईल यासाठी दबाव टाकण्यात आला. असे आव्हाड यावेळी म्हणाले.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
विवियाना मॉलमधील प्रेक्षकाला मी मारहाण केली नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. हर हर महादेव चित्रपटाला आपला विरोध का आहे, त्यामागे आपली भूमिका काय आहे याबद्दल आव्हाडांनी यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून स्पष्ट केली. हर हर महादेव या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या संबंधित चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच इतिहासाचा याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे ते यावेळी म्हणाले. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकांनी चुकीचा इतिहास दाखवला असून त्यांनी लोकांची माफी मागितली पाहिजे. असे मत त्यांनी मांडले आहे.
पुढे ते म्हणाले, "महाराष्ट्रत हा चित्रपट कुठेही लागू नये यासाठी याला मी विरोध करत होतो, आणि पुढेही करणार आहे. जामीन देणारे गुन्हे दाखल असताना मला आत कसा बसवता येईल यासाठी दबाव टाकण्यात आला. पण जितेंद्र आव्हाडला आतमध्ये आम्ही बसून दाखवलं हे महाराष्ट्राला दाखवायचं होतं. म्हणून सेक्शन 7 क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट लावण्यात आला आणि नॉन बेलेबल सेक्शन लावला. अधिकाराचा चुकीचा वापर केला गेला दबाव टाकण्यात आला. हे काम कोणाचं वेगळं सांगायला नको त्यांचं नाव सुद्धा मला काढायच नाही." असे विधान त्यांनी केले.
मराठ्यांचं शौर्य कमी करायचं हा हेतू
बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात चुकीचं लिखाण झालं, हे आम्ही समोर आणलं. पण याचं समर्थन राज ठाकरे यांनी केलं. हर हर महादेव एवढा विकृत चित्रपट महाराष्ट्रात आलेला नाही. त्यामागे कुठलाही पुरावा नाही, मराठ्यांचं शौर्य कमी करायचं हा हेतू आहे. असा आरोप आव्हाड यांनी यावेळी बोलताना केला.