Babajani Durrani  Latest News
Babajani Durrani Lokshahi

अजित पवारांना मोठा धक्का! बाबाजानी दुर्राणींनी शरद पवार गटात केला प्रवेश, म्हणाले; "पवार साहेबांना कसं सोडलं..."

परभणीतील पाथरीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Babajani Durrani Speech : परभणीतील पाथरीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश केला. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोकांनी हातात घेतली आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीतही असच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पवार साहेबांमुळेच मी दोनदा विधान परिषदेवर गेलो. साहेबांमुळे विधान परिषदेचं मला तिकिट मिळालं आणि पाच वर्ष मी आमदार झालो, असं मोठं विधान दुर्राणी यांनी केलं आहे.

बाबाजानी दुर्राणी आपल्या भाषणात म्हणाले, पवार साहेबांनी मला कधीही डावलला नाही. माझ्याकडून काहीतरी बेईमानी झाली असेल, मी साहेबांना कसं सोडलं, याची मला खंत आहे. पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली भविष्यात या राज्याचं सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. पक्ष बांधणीसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी मला जी काही जबाबदारी दिली जाईल, ती मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मजबूत करण्यासाठी निश्चितच पार पाडेल.

लोकसभेत आपण १० पैकी ८ जागा जिंकल्या. दोन जागा चुकीच्या चिन्हामुळे गेल्या. आम्ही जरी दुसरीकडे असलो, तरी आम्ही आतून साहेबांसोबतच होतो. भाजपसोबत जे पक्ष आणि नेते गेले, त्यांन मदत करण्याची मुस्लीम समाजात मानसिकता नव्हती. आमच्या समाजाचा माझ्यावर दबाव होता, ते सांगत होते की तुम्ही साहेबांसोबत जा.

आमचे लोक मला सांगायचे, तुमचा निर्णय चुकला आहे. तुम्ही साहेबांसोबत राहायला पाहिजे. मला काही मिळो किंवा न मिळो, पण ज्या माणसाने मला मोठं केलं त्यांच्यासोबत राहण्याची पुन्हा मला संधी मिळाली आहे. ज्या माणसामुळे मी आमदार म्हणून महाराष्ट्रात फिरलो, याची परतफेड मी पक्षात व्याज्यासकट देणार आहे, असंही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com