NCB
NCBTeam Lokshahi

Aryan Khan प्रकरणात मोठी बातमी; दोन NCB अधिकाऱ्यांना केलं निलंबित

या प्रकरणातील साक्षीदार आणि पंच असलेल्या प्रभाकर साईलचा मुंबईत मृत्यू झाला.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईवरून राज्यातील वातावरण तापलं होतं. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) या प्रकरणात अटक करण्यात आल्याने राज्यभरात या प्रकरणाची चर्चा झाली होती. त्यानंतर मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणात आता एक महत्वाची घडामोड समोर येतेय.

NCB
...तोपर्यंत हा लढा सुरु राहील; अंतरिम जामीन मिळाल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

आर्यन खान प्रकरणातील दोन NCB अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी, अधीक्षक व्ही.व्ही. सिंग यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. संशयास्पद हालचाली केल्याबद्दल मुंबई NCB ने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

NCB
...म्हणून मी नॉट रिचेबल होतो; मुंबईत दाखल होताच सोमय्यांनी दिलं उत्तर

दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील साक्षीदार आणि पंच असलेल्या प्रभाकर साईलचा मुंबईत मृत्यू झाला. प्रभाकर साईलने या प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. साईलच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी देखील करण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com