Nawab Malik
Nawab MalikTeam Lokshahi

"ED ने थेट नवाब मलिकांचं सलाईन काढून जबरदस्तीने करवून घेतला डिस्चार्ज"

नवाब मलिक यांना ईडीकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याची माहिती समोर आली.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने (ED) त्यांच्यावर कारवाई केली असून, ते मागच्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात अडकलेले आहेत. मात्र अशातच त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना आता पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच नवाब मलिकांच्या वकिलांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

Nawab Malik
"ऊसाला पाणी जास्त लागतं, त्याऐवजी शेतकऱ्यांनी..."; अजित पवारांचा सल्ला

नवाब मलिक हे जे. जे. रुग्णालयात भरती असताना योग्य तशी वागणूक दिली गेली नाही. त्यांना अक्षरश: पिण्याच्या पाण्याची बॉटल देखील देण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडून मलिक यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज करून घेतला असल्याचा धक्कादायक आरोपही यावेळी करण्यात आली आहे.

Nawab Malik
"भोंग्याच्या मुद्दयावर जनतेने राज ठाकरेंना ठेंगा दाखवला"

रुग्णालयात सलाईन सुरू असताना कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे सलाईन काढली आणि डिस्चार्ज पेपरवर सही घेतली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मलिक यांना ईडीतर्फे अद्यापपर्यंत आरोप पत्राची प्रत देखील देण्यात आली नसल्याची माहिती कोर्टाच्या निदर्शनात आणण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने वरील आरोपांसंदर्भात योग्य ते निर्देश ईडीला देण्याची विनंती आज कोर्टासमोर करण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांचे वकिल निलेश भोसले यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com