Navneet Rana - Ravi Rana
Navneet Rana - Ravi RanaTeam Lokshahi

Navneet Rana vs Shivsena Live : राणा दाम्पत्य घरात नजर कैदेत

Published by :
Team Lokshahi
Published on

राणा दाम्पत्यासाठी शिवसेनेकडून अ‍ॅम्बूलन्स

खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसेनेच्यावतीने राणा दाम्पत्यासाठी अ‍ॅम्बूलन्स तैनात केली. यावर 'बंटी-बबली'साठी राखीव असे पोस्टरही चिकटवलेत. शिवसेना स्टाईल दोघानांही महाप्रसाद दिल्यास त्यांना या अ‍ॅम्बूलन्समधून थेट अमरावतीला मोफत सेवा देणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे, युवा सेना कोअर कमिटी सदस्य राहुल कनाल यांनी सांगितले.

राणा दाम्पत्य घरात नजर कैदेत

राणा दाम्पत्यांन घरात नजर कैदेत आहे. दहा ते बारा पोलिसांच्या नजर कैदेत असल्याचे वृत्त आहे. परंतु राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणारच असल्याचे सांगितेल.

मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणारच

नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणारच असा निर्धार खासदार नवनीत राणा यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्यांकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पोलिस शिवसेनेच्या दबाबाखाली काम करत आहे, असा आरोप राणा यांनी केला. दरम्यान हनुमान चालीसा कुठे वाचावी, हे गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना केला.

घराबाहेर पडू नको- मुंबई पोलिस राणा दाम्पत्याच्या घरी

मुंबई पोलिस राणा दाम्पत्याच्या घरी पोहचले असून घराबाहेर पडू नका, अशी विनंती पोलिसांतर्फे राणा दाम्पत्यांना करण्यात आली आहे.

राणांनी हनुमान चालीसा घरात वाचावी-गृहमंत्री

राज्यात सुरु असलेल्या हाय व्होलटेज ड्रामावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. कायदा व सुव्यवस्थेची काळजी घ्यावी. दुसऱ्यांच्या घरासमोर ड्रामा करु नका. हनुमान चालीसा आपल्या घरातच वाचावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नका

पोलिसांनी राणा दाम्पत्यास सोशल मीडियावर प्रतिक्रिया न देण्याची समज दिली आहे. रवी राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मातोश्रीवर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नका, अशी समज पोलिसांनी दिली.

पूजा करतांनाचा व्हिडिओ शेअर

राणा दाम्पत्यांनी पूजा करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच शिवसैनिकांकडून गुंडागर्दी होत असल्याचा आरोप केला आहे. शिवसैनिकांच्या गुंडागर्दीचे दर्शन संपुर्ण महाराष्ट्र पाहत असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. आता बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. आमच्या घरावर हल्ला झाला असून पोलिसांनी आम्हाला मातोश्रीवर जाण्यापासून रोखले आहे. आम्ही मातोश्रीवर जाणार असून आम्हाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असणार आहे.

शिवसैनिकांशी घेतलेला पंगा महागात पडणार

शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसैनिकांशी घेतलेला पंगा राणा दाम्पत्यास महागात पडणार आहे, असे शिवसैनिक सांगत आहे. शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या निवासस्थानात घुसले असून राणा यांनी बाहेर यावे, अशी मागणी करत आहे.

राणा दाम्पत्याच्या इमारतीत शिवसैनिक घुसले

राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील इमारातीत शिवसैनिक घुसले आहे. पोलिसांक़डून शिवसैनिकांना अ़डवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

राणा दाम्पत्याला पोलिस ताब्यात घेणार

नवनीत राणा व रवी राणा यांना पोलिस ताब्यात घेणार आहे. त्यानंतर त्यांना अमरावतीत हलवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली. यापुर्वीच त्यांना कलम १४९ ची नोटीस देण्यात आली आहे.

Navneet Rana - Ravi Rana
अशी आहे नवनीत राणा रवी राणा यांची लव्हस्टोरी...

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसाच्या मुद्द्यांवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा सकाळी ९ वाजता हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यासंदर्भातील प्रत्येक घडामोडी वाचा...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com