नवनीत राणा पोलीस आयुक्तांवर संतापल्या
अमरावती कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कुप्रसिद्ध त्यातच आज जी घटना घडली त्याने अमरावतीमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अमरावतीच्या पठाणचौक चाराबाजार परिसरात दोन तरुणांमध्ये वाद झाला या वादातून गोळीबार झाला. हाच वाद सुरु असताना शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या पायाला गोळी लागली. या जखमी विद्यार्थीनीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (navneet rana angry with police commissioner after shooting incident accuses aarti singh of being corrupt)
अमरावतीतलं राजकारण हे पुन्हा पेटून उठलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या गोळीबारानंतर अमरावतीच्या पोलिस आयुक्तांना थेट टार्गेट केलंय. तसेच पोलीस आयुक्तांवरती त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामुळे आता पोलीस आयुक्त विरुद्ध खासदार हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.
अमरावती येथील पठाण चौकानजीकच्या चारा बाजार परिसरात एका व्यक्तीने भररस्त्यावर केलेल्या गोळीबारात 13 वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हल्लेखोराला अन्य कुण्या व्यक्तीवर गोळी झाडायची होती. परंतु, चुकून गोळीबारात ही मुलगी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संबंधित घटना ही आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली. अमरावती शहरातील इतवारा भागातील पठाण चौक चाराबाजार परिसरात संबंधित घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांमध्ये वाद झाला. याच वादातून गोळीबार झाला. या गोळीबारावेळी 13 वर्षीय शालेय विद्यार्थीनीच्या पायाला गोळी लागली. ही मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. पण दरम्यान रस्त्यात गोळीबार झाला आणि तिच्या पायाला गोळी लागली. या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.