Navjot Singh Sidhu : सिद्धूला दिलासा नाहीच, आता अटक होणार
काँग्रेस नेते (Congress Leader) नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)यांना दिलासा मिळाला नाही. त्यांच्या वतीने त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) आत्मसमर्पणासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. सिद्धूला आता कोर्टात शरणागती पत्करावी लागणार आहे, अन्यथा पंजाब पोलिस त्याला अटक करतील.
सिद्धूचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एएम खानविलकर म्हणाले की, आम्ही हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवत आहोत, ते त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतील. सिद्धूने प्रकृती अस्वास्थ्यामुळे आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयाकडे एक आठवड्याची मुदतवाढ मागितली होती.
सिद्धू यांच्या अर्जावर आज सुनावणी झाली नाही तर 10 जुलैपर्यंत त्यांना दिलासा मिळणार नाही. कारण न्यायालयाला 23 मे ते 10 जुलैपर्यंत उन्हाळी सुट्टी आहे. या दरम्यान, फक्त तातडीच्या प्रकरणावर सुनावणी केली जाते. सुमारे 34 वर्षांपूर्वी घडलेल्या एका रस्त्यावरील वादाच्या प्रकरणात काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sindhu )यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. IPC च्या कलम 323 नुसार सिद्धूवर 34 वर्षापुर्वी गुन्हा दाखल होता. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने याआधी सिद्धूंना हत्येप्रकरणी दोषी असलेल्या सिद्धूंना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, तर सुप्रीम कोर्टाने त्यांना याच प्रकरणात निर्दोष ठरवत, दुखापतीसाठी 1,000 रुपये दंड ठोठावला होता. परंतु पुनर्विचार याचिकेत गुरुवारी एका वर्षाची शिक्षा दिली.