National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधींना 'या' प्रश्नांना जावे लागले सामोरे
National Herald Case ED Questions Rahul Gandhi : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी चौथ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले. यादरम्यान ईडीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) असोसिएटेड जर्नल लिमिटेडशी संबंधित अनेक प्रश्न विचारले आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना विचारण्यात आले की असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची आर्थिक स्थिती खरोखरच इतकी वाईट आहे की त्यांना कर्ज घ्यावे लागले. २०११ मध्ये असोसिएटेड जर्नल्सचे कार्यालय लखनौहून दिल्लीला का हलवण्यात आले? (National Herald Case ED Questions Rahul Gandhi)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सकाळी ११.०५ वाजता दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडी मुख्यालयात त्यांच्या "झेड प्लस" श्रेणीतील सीआरपीएफ सुरक्षा एस्कॉर्टसह पोहोचले. फेडरल एजन्सीच्या कार्यालयाभोवती पोलिस आणि निमलष्करी दलांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. या परिसरात कलम 144 लागू आहे.
राहुल गांधींची ईडी कार्यालयात चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आज चौथ्या दिवशी ईडी राहुल गांधींची चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने राहुल गांधींना अनेक प्रश्न विचारले आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना विचारण्यात आले की असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही 1937 मध्ये केवळ 3 लाखांपासून सुरू झाली होती, तुम्हाला माहिती आहे का की 2011 मध्ये त्यांची एकूण मालमत्ता किती होती? यापूर्वी, वायनाडमधील काँग्रेस खासदाराने गेल्या आठवड्यात तीन दिवस ईडी कार्यालयात सुमारे 30 तास घालवले होते, जिथे त्यांची अनेक सत्रांमध्ये चौकशी करण्यात आली होती.
ईडीने राहुलला कोणते प्रश्न विचारले?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही 1937 मध्ये केवळ 3 लाख रुपयांपासून सुरू झाली होती. तुम्हाला माहिती आहे का की 2011 मध्ये त्याची एकूण मालमत्ता किती होती?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची आर्थिक स्थिती खरोखरच इतकी वाईट होती का की कर्ज घ्यावे लागले?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे कार्यालय 2011 मध्ये लखनौहून दिल्लीला का हलवण्यात आले?
50 लाखांऐवजी 90 कोटींचे कर्ज घेण्यासाठी यंग इंडियनमध्ये झालेल्या बैठकीत तुम्ही सहभागी होता का?
कोलकाता येथील डोटेक्स कंपनीकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेण्याबाबत झालेल्या बैठकीत तुमचा सहभाग होता का?